Today Horoscope In Marathi

आज तुमच्या राशीमध्ये कोणकोणत्या चांगल्या गोष्टी आल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास सज्ज व्हा आणि ज्या गोष्टी फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही स्वीकार करा. आज तुमच्यासाठी काय वाढून ठेवले आहे, ते जाणून घ्या.


today horoscope in marathi, aajche rashi bhavishya
Today Horoscope In Marathi, 16 November 2019.


Today Horoscope In Marathi



आजचे पंचांग:-


तिथी: कार्तिक कृ. ४ चतुर्थी.
नक्षत्र: रोहिणी.
योग: शिव.
करण: गरज.

तर मग चला पाहूया आजचा शनिवार कसा राहील तुमच्यासाठी...


मेष:
आजचा दिवस पूर्णपणे शुभ आहे. आजचे महत्वाचे निर्णय घेणे टाळा. प्रवास घडेल. लेखनकाम करण्यास  दिवस आहे.
शुभ रंग : पांढरा.
भाग्यांक : ७


वृषभ:
आज मन स्तिर ठेवण्याचा प्रयन्त करा, तसे झाले नाही तर चांगली हाती आलेली संधी गमवाल. आज समजुतीने वागा त्यामुळे होणारे संघर्ष टळतील.
शुभ रंग :पांढरा.
भाग्यांक : ७


मिथुन :
आज उत्तम धनलाभ होईल. रुचकर, स्वादिष्ठ भोजनाचा आस्वाद घ्याल. मित्र आणि कुटुंबियांमुळे आजचा दिवस आनंददायी ठरेल.
शुभ रंग : आकाशी.
भाग्यांक : ५


कर्क :
आज मन चंचल राहील, त्यामुळे आज कोणतेही निर्णय घेऊ नका. कौटुंबिक खर्च होईल. तुमच्या वाणीवर आज ताबा ठेवा. अपमान शहर करावा लागू शकतो, प्रकृतीची काळजी घ्या.
शुभ रंग : कला.
भाग्यांक : ८


सिंह :
आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. मित्रांकडून आज लाभ होऊ शकतो. आज कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका, नाहीतर हाती आलेल्या चांगल्या संधीला गमावून बसाल.
शुभ रंग : पांढरा.
भाग्यांक : ७


कन्या :
व्यावसायिक आणि नोकरीदारांसाठी आजचा दिवस फारच चांगला आहे, त्यामुळे व्यापारात फायदा होईल आणि नोकरीमध्ये बढतीची शक्यता आहे. वडिलांकाढून लाभ होईल.
शुभ रंग : हिरवा.
भाग्यांक : ५


तूळ :
व्यावसायिकांना आजचा दिवस चांगला आलेला आहे. आपल्या सहकाऱ्यांपासून मदतीचे अपेक्षा ठेवू नये. प्रवास घडेल, तीर्थयात्रा घडेल. लिखाणकामात रस निर्माण होईल. कुटुंबामधून आनंदाची बातमी मिळेल.
शुभ रंग :बदामी.
भाग्यांक : ७


वृश्चिक :
खर्चाचे प्रमाण वाढेल. आज स्वतःवर नियंत्रण ठेवा. नवीन कामे कारण्याव्ह विचार करू नका, अपयश येण्याचे योग्य आहेत. आर्थिक संकट येऊ शकते.
शुभ रंग : लाल.
भाग्यांक : ९


धनू :
आजचा दिवस आनंदी जाईल. भागीदारीतून फायदा होईल. मित्रांसोबत प्रवास घडेल. लिखाणकामासाठी चांगला दिवस आहे.
शुभ रंग : गुलाबी.
भाग्यांक : ६


मकर :
व्यावसायिकांना आजचा दिवस लाभदायक आहे. पैश्याची देवाणघेवाण करू शकाल, त्यामधून फायदा होईल. कौटुंबिक सुख शांती नांदेल. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. प्रकृती चांगली राहील.
शुभ रंग : गुलाबी.
भाग्यांक : ६


कुंभ :
अनपेक्षित खर्चाचे प्रमाण वाढेल. अपचनाचा त्रास होईल. बौद्धिक कौशल्यात भाग घ्याल. बोलण्या चालण्यात बदलाव जाणवेल.
शुभ रंग : करडा.
भाग्यांक : ४


मीन :
आजचा दिवस फारसा चांगला नाही. आजचा दिवस कंटाळवाणा जाईल. कौटुंबिक वादविवाद होण्याची शक्यता आहे. प्रकृती ठीक राहणार नाही.
शुभ रंग : सोनेरी.
भाग्यांक : १


In this Website you will get Today horoscope In Marathi. You can read this Marathi Horoscope Today for free of cost every day. This Rashi Bhavishya Marathi will give you daily guide to you about how your whole day and your friends, so share this article with your Friends, Relatives and Loved Ones.
We are supposed to update 
Rashifal 
Today Marathi for you in earlier.

Hope you liked our Today Horoscope In Marathi. Share it, Comment it. Thank You.



दैनिक राशीफळ (Today Horoscope In Marathi)

दिवसभराची ग्रहभ्रमण लक्षात घेऊन ज्योतिषी दैनिक राशिभविष्य तयार होते. बऱ्याच लोकांना सकाळी उठल्या उठल्या वर्तमानपत्रामधील किंवा इंटरनेट वर वाचायला मिळणारे स्वतःचे दैनिक राशीभविष्य वाचण्याची जणू सवयच झालेली असते, मग ही गोष्ट त्यांनी मान्य करोत अथवा न करोत. हे दैनिक भविष्य साधारण असते, लोक त्याच्याशी असं ना तसं स्वतःचा संबंध जोडून मोकळे होतात आणि ते राशीभविष्यावर पूर्णपणे निर्भर होतात. ते नेहमी त्या भविष्यातील स्वतःला चांगला किंवा सकारात्मक मजकुरावरच लक्ष देतात आणि त्यांना त्या मजकुरामध्येच रस असतो. त्यामुळे त्यांचा दिवस चांगला जातो आणि ते आनंदी राहतात. त्यावर आधारित ते त्यांच्या दिवसाचे नियोजन करून ठेवतात.
दैनिक राशीफळामध्ये आपल्याला आजच्या दिवसात काय केले कोणत्या गोष्टीवर लक्ष दिले पाहिजे आणि कोणत्या गोष्टींपासून लांब राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे या विषयी माहिती दिली जाते.आजचा दिवस तुम्हाला तुमचा प्रगतीचा रास्ता दाखवतो कि, आपल्या समोर नवे संकट उभे करू शकतो.
राशीफळ हे पुरातन ज्योतिष शास्त्राची एक विधि आहे ज्याच्या माध्यमाने विविध कालखंडा बाबतीत भविष्यवाणी केली जाउ शकते. जिथे दैनिक राशीफळ दिवसभरातील घटनांना घेऊन भविष्यवाणी करते. त्याचप्रमाणे साप्ताहिक, मासिक तसेच वार्षिक राशीफळ मध्ये क्रमशः सप्ताह, महिने आणि वर्षाचे फळादेश/राशीफळ दिले जाते. वैदिक ज्योतिषात मेष, वृषभ, मिथुन, सिंह, कर्क, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ व मीन या बारा राशींचे भविष्य कथन केले जाते. ठीक त्याच प्रमाणे २७ नक्षत्रांचे ही भविष्यवाणी केली जाऊ शकते. प्रत्येक राशीचे आप आपले स्वभाव व गुणधर्म असतात अतः प्रतिदिन ग्रहांच्या स्थिती नुसार आणि भ्रमणानुसार जीवनात घडणाऱ्या घटना वेगवेगळ्या असतात. हेच कारण आहे की प्रत्येक राशीचे राशीफळ वेगवेगळे असते. येथे दिलेल्या दैनिक राशीफळात आम्ही अचूक खगोलीय घटनांच्या आधारावर फळादेश दिलेले आहेत. याच प्रकारे साप्ताहिक राशीफळात आम्ही सूक्ष्मतम ज्योतिषीय स्थितीवर लक्ष दिलेले आहे. जर आपण मासिक राशीफळा बद्दल बोललो तर साप्ताहिकाची कसोटी त्यावर ही लागू होते. वार्षिक राशीफळात आमचे अनुभवी ज्योतिषांनी वर्षभर होणारे सर्व ग्रहीय परिवर्तन, संक्रमण, भ्रमण आणि अनेक अन्य ब्रह्मांडीय गणनांच्या माध्यमाने वर्षाचे विभिन्न पहिलु, आरोग्य, वैवाहिक जीवन व प्रेम, धनधान्य आणि समृद्धी, कुटुंब आणि व्यवसाय तसेच नोकरी पेशा जश्या सर्व विषयांची पूर्ण विस्तारपणे विवेचना केली गेली आहे.

हे राशीफळ नक्की कोणत्या राशीवर आधारित असते जन्म राशीच्या कि नावं राशीच्या?

ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, दैनिक फळादेशाला जन्म राशीवर आधारित असते. “नावं” हे राशीच्या हिशोबानेच ठेवले जाते. बऱ्याच पंडितांचे मानणे आहे की, नाव राशी, जन्म राशी हे दोन्हीही खूप महत्वपूर्ण आहे.

हे राशीफळ कोणत्या राशीवर आधारित असते सुर्य राशीच्या की चंद्र राशीच्या?

राशीफळ हे चंद्र राशी म्हणजेच मुन साइन वर आधारित आहे. या भविष्य कथनाला सन साइन (सुर्य राशी) ने वाचणे योग्य नाही. भारतीय जज्योतिषामध्ये सर्वत्र चंद्र राशीलाच महत्व दिले जात आले आहे आणि अजूनही दिले जाते.

दैनिक राशीफळ कसे शोधले जाते?

भारतीय ज्योतिष मध्ये वर्तमान ग्रह स्थितीला संक्रमण किंवा भ्रमण म्हणतात. आपल्या राशीचे ग्रह वर्तमानात कुठे स्थित आहे यावर आजचे राशीफळ आधारित असते. आपल्या राशीला लग्न मानून त्यात संक्रमणाचे ग्रह ठेऊन जी कुंडली बनते ती कुंडली राशीफळंच मुख्य आधार आहे. याच्या व्यतिरिक्त पंचागाचे इतर अवयव जसे वार, नक्षत्र, योग आणि करण हे ही पहिले जाते. राशीफळ  लेखना मध्ये कुंडली ग्रहांची स्थिती आणि दशा इत्यादीचा वापर होत नाही.

दिलेले राशीफळ हे पूर्णपणे योग्य असते का ?


'राशीफळ' या नावानेच स्पष्ट होते की, राशीफळ राशीच्या आधारावर लिहिले गेलेले असते. संपूर्ण जगामध्ये लाखो लोकांच्या बाबतीत फक्त बारा राशींचें भविष्य कथन किंवा भविष्यवाणी करण्याच्या कारणाने याला सामान्य भविष्यवाणी ही मानली जाऊ शकते. अचूक भविष्यासाठी कुठल्या ज्योतिष किंवा पंडित करून संपूर्ण कुंडलीचे अध्ययन केले पाहिजे.


आमची माहिती जर तुम्हाला आवडली असेल, तर शेअर आणि कमेंट करायला विसरू नका...