Today Horoscope In Marathi

दैनिक राशीभविष्य

दैनिक राशीभविष्य - ८ नोव्हेंबर २०१९ | Daily Rashi Bhavishya In Marathi | Daily Horoscope in Marathi

Today's Horoscope In Marathi

दैनिक राशी भविष्य शुक्रवार, ८ नोव्हेंबर २०१९

आज तुमच्या राशीमध्ये कोणकोणत्या चांगल्या गोष्टी आल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास सज्ज व्हा आणि ज्या गोष्टी फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही स्वीकार करा. आज तुमच्यासाठी काय वाढून ठेवले आहे, ते जाणून घ्या.

todays horoscope in marathi, aajche rashi bhavishya
Today's Horoscope In Marathi

Daily Rashi Bhavishya


१२ पैकी ७ राशींना संमिश्र फळ देणारा दिवस आहे.


शुक्रवार, ८ नोव्हेंबरला दिवसाची सुरुवात पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामध्ये होत असून, ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभामुळे १२ पैकी ८ राशीच्या लोकांवर अशुभ प्रभाव असेल. याच्या प्रभावाने काही लोकांमध्ये वाद होऊ शकतात. काही लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये किंवा आरोग्याच्या बाबतीत चढ-उतार पाहायला मिळतील. बाकी राशींच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

या मग जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार


मेष: 
तुम्हाला बळीचा बकरा बनविण्याचा प्रयत्न होऊ शकतो, त्यामुळे अत्यंत सतर्क राहा. ताण तणाव आणि दडपणात वाढ होऊ शकते. जागा जमिनी आणि आर्थिक व्यवहारांसाठी चांगला दिवस. पती/पत्नी  सोबत योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या कुटुंबामध्ये सुख-समृद्धी व शांतता नांदेल. तुमचे दुःख सांत्वन करण्यासाठी एक खास मित्र/मैत्रीण पुढाकार घेण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. बऱ्याच घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे आजचा दिवस हा उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी राहील. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील खूप छान दिवस राहणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल. अत्यंत उत्साही व आनंदी असा आजचा दिवस. कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. विवाहाबद्दल बोलणी करायची असतील तर आजचा दिवस योग्य राहील.

शुभ रंग : लाल
शुभांक :


वृषभ: 
चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमच्या मनात इच्छा निर्माण होईल. आज तुमच्यासमोर आलेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार केला गेला पाहिजे. घरगुती प्रश्नांकडे सखोल लक्ष देणे गरजेचे आहे. तुमच्या प्रेम स्मिताने प्रियजनांचा दिवस उजळून टाका. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाऱ्या  लोकांसोबत जाण्यास नकार द्या. तुमचे वडीलधारी तुमच्या जोडादीराला आज सुंदरशी भेटवस्तू देतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक छान होईल. कामाच्या ठीकाणी स्वतःला सिध्द करायचे असेल तर जास्त जबाबदाऱ्या वगळून चालणार नाहीत.कामाच्या व्यापामुळे आज तब्येतीकडे लक्ष द्या.

शुभ रंग : सोनेरी
शुभांक :


मिथुन :
तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनाने आणि विश्वासामुळे तुमच्या अवतीभवतीच्या लोकांवर प्रभाव पाडण्याची शक्यता आहे. अचानक पैसे आल्यानमुळे तुमची राहिलेली बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च आणि बाकी गोष्टी भागतील. नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाऊ शकता. नवीन उद्योगामध्ये आशा ठेवण्यास काही हरकत नाही. आपले संभाषण, बोलणे कायम स्पष्ट असावे, अन्यथा अशा गोष्टी आपला कोणताच ठावठिकाणा ठेवणार नाहीत. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासोबत घालवाल. महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती निर्माण होणार आहे.आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. महत्वापूर्ण निर्णय अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्यानेच घ्या.

शुभ रंग : पिस्ता
शुभांक :


कर्क : 
पूर्वी केलेल्या प्रकल्पामुळे मिळालेले यश यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नवीन संकल्पनांचा वापर करा. आपल्या अपेक्षेप्रमाणे मुलांनी जगावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करा. मात्र त्याच्या प्रयत्नांकडे पाहता, यशाची अपेक्षा करू नका. आपल्या प्रोत्साहनामुळे त्याच्या उत्साहाला उत्तेजन नक्की मिळेल. तुमच्या प्रेमसंबंधावर आज विपरीत परिणाम संभवतो. कामाच्या ठिकाणी आज तुमचा सगळ्यावर प्रभाव राहील.  आज अती आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. ताकही फूंकून प्या.

शुभ रंग : मोतिया
शुभांक :


सिंह : 
 झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांसोबतआज भरपूर वेळ घालवता येईल. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिके/प्रेमीका ला दुखवू नका, अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागेल. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस खूप सुंदर असेल. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस अविस्मरणीय ठरेल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासमवेत फिरायला भरपूर वेळ मिळेल, पण शरीरावर परिणाम होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस. दुकनदारांच्या गल्ल्यात लक्षणिय वाढ होईल. नोकरदार वरीष्ठांची मर्जी संपादन करू शकतील. वैवाहीक जिवनात गोडीगुलाबी राहील.

शुभ रंग : आकाशी
शुभांक :


कन्या :
अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. पत्नीबरोबर खरेदी करणे आनंददायी ठरेल. आज तुम्ही तुमच्या आयुष्यातील खऱ्या  प्रेमाला मुकाल. पण चिंता करू नका वेळ आली कि प्रत्येक गोष्ट बदलते आणि त्यानुसार तुमचे आयुष्यही प्रेमाने भरून जाईल. कार्यालयीन काम फत्ते होईल कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम शंभर टक्के सहकार्य तुम्हाला लाभेल. आज तुमच्याजवळील चांगली  कल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेबाहेर तुम्हाला फायदा होईल. तुमच्या कुटुंबात तुमचे वाद होतील, पण दिवसाच्या शेवटी सगळे भांडण निवळेल. कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा जोर वाढलेला आहे. नोकरीत हाताखालच्या माणसांशी जुळवून घ्यावे लागेल.जुनी येणी परत येण्याची शक्यता आहे.

शुभ रंग : मोरपंखी
शुभांक :


तूळ : 
घरात काम करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. घरगुती वस्तुंची नीट हाताळणी करा. तुमच्याजवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. त्यामुळे येणा-या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल. तुम्ही भावनांवर नियंत्रण ठेवले तर त्रास होईल, पण तुमच्या आजुबाजूच्या लोकांना वाईट बोलू नका त्यामुळे तुम्ही एकटे पडू शकाल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरले. बऱ्याच काळापासून ते वाट पाहात असलेली कीर्ती आणि मान्यता त्यांना मिळेल. आवक पुरेशी असेल. अधुनिक राहणीमानाची आवड जाेपासाल. उच्चशिक्षण घेणाऱ्यांच्या अपेक्षा वाढतील. एखाद्या नवीन विषयात गोडी निर्माण होईल.

शुभ रंग : चंदेरी
शुभांक :


वृश्चिक : 
तुमचा उत्साह वाढविण्यासाठी तुमचे मन प्रसन्न ठेवा. दूरदृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करा. दिवसाच्या शेवटी अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंब आनंदी होईल. प्रेमप्रकरण गावाला सांगायची गरज नाही. तुमच्या कार्यालयात तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. आज तुम्हाला लोकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्या मनासारखे वागणार नाही, त्यामुळे तुमची चिडचिड होईल. आज पैशाची कमतरता भासणार नाही. आज आईला दुखावू  नका.

शुभ रंग : जांभळा
शुभांक :


धनू :
खूपच चिंता करू नका त्यामुळे तुमची मानसिक शांतात भंग पावेल, कारण चिंता केल्यामुळे प्रकृती बिघडते. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक करा फायदेशीर ठरेल. प्रभावी आणि महत्त्वाच्या पदांवरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लाव ही चांगली संधी ठरेल तुमच्या भावी कार्यासाठी. कोणते जुने भांडण असेल  तर आजच सोडवा. वरिष्ठांकडून कौतुक होईल तसेच ते पाठिंबा देतील त्यामुळे तुमचा आत्मविश्वाास वाढू शकेल. वडिलधार्यांकडून मार्गदर्शन घ्या. तुमचा जोडीदार तुम्हाला मनस्ताप देईल. आजचा दिवस घराबाहेर जाईल. बेरोजगारांच्या नोकरीमध्ये यश येईल. आज भावंडांमधे समजुती राहील..

शुभ रंग : हिरवा
शुभांक :


मकर :
आज खूप धावपळ होईल, आणि अधिक विश्रांती घ्यावी लागेल. आज केलेली गुंतवणूक तुमच्या भावि सुरक्षिततेला पूरक ठरेल. कार्यालयात आपण स्वत:ला खूपच कामात ठेवल्याने कौटुंबिक गरजा आणि आवश्यकता, अपेक्षांकडे दुर्लक्ष होईल. आपल्या जीवनसाथीचा मूड चांगला नसेल, त्यामुळे खूप काळजीपूर्वक सर्व गोष्टी हाताळा. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस अविस्मरणीय ठरेल. तुमच्या दोघांमध्ये बाहेरच्यांच्या ढवळाढवळी होऊ देऊ नका त्यामुळे तुमच्या नात्यावर दुष्परिणाम होईल.  पूर्वीच्या केलेल्या श्रमांचे आता चीज होईल व यश मिळण्याची शक्यता आहे. छान दिवस जाईल.

शुभ रंग : भगवा
शुभांक :


कुंभ :
तुमचे व्यक्तिमत्व आज खूप छान काम करील. आपल्या माहितीतील लोकांमुळे पैसे मिळवण्याचा नवा स्रोत सुरू होईल. नवजात बालकाच्या प्रकृतीविषयी प्रश्न उद्भवतील. आजच्या दिवशी नवी भागीदारी येईल. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेतू शकता. तुमच्या जोडीदारासमवेत हा एक छान दिवस असणार आहे. तरुणांनी मौजमजा करताना भान ठेवावे. उध्दटपणा करू नये. आवक पुरेशी असली तरी बचत करा.

शुभ रंग : पांढरा
शुभांक :


मीन :
तुमच्या आजारात भर पडेल. जुनी देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. कुटुंबसोबत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे दुःख घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा, त्यांना तुमच्या मानसिक स्थिती बदलून देऊ नका. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च राहील  कारण तुमचे प्रिय तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील. परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ नका, नाहीतर कोणत्याही प्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामोरे जावे लागेल. आपल्या अधिकारांचा दूरुपयोग करू नका. व्यवसायात स्पर्धेस तोंड देण्यासाठी अथक कष्ट करायची तयारी ठेवा.

शुभ रंग : गुलाबी
शुभांक :


In this Website you will get Today's horoscope In Marathi. You can read this Marathi Horoscope Today for free of cost every day. This Rashi Bhavishya Marathi will give you daily guide to you and your friends, so share this article with your Friends, Relatives and Loved Ones.
We are supposed to update 
Rashifal 
Today Marathi for you in earlier.

Hope you liked our Today's Horoscope In Marathi. Share it, Comment it. Thank You.


दैनिक राशीफळ (Daily Horoscope In Marathi)

दिवसभराची ग्रहभ्रमण लक्षात घेऊन ज्योतिषी दैनिक राशिभविष्य तयार होते. बऱ्याच लोकांना सकाळी उठल्या उठल्या वर्तमानपत्रामधील किंवा इंटरनेट वर वाचायला मिळणारे स्वतःचे दैनिक राशीभविष्य वाचण्याची जणू सवयच झालेली असते, मग ही गोष्ट त्यांनी मान्य करोत अथवा न करोत. हे दैनिक भविष्य साधारण असते, लोक त्याच्याशी असं ना तसं स्वतःचा संबंध जोडून मोकळे होतात आणि ते राशीभविष्यावर पूर्णपणे निर्भर होतात. ते नेहमी त्या भविष्यातील स्वतःला चांगला किंवा सकारात्मक मजकुरावरच लक्ष देतात आणि त्यांना त्या मजकुरामध्येच रस असतो. त्यामुळे त्यांचा दिवस चांगला जातो आणि ते आनंदी राहतात. त्यावर आधारित ते त्यांच्या दिवसाचे नियोजन करून ठेवतात.
दैनिक राशीफळामध्ये आपल्याला आजच्या दिवसात काय केले कोणत्या गोष्टीवर लक्ष दिले पाहिजे आणि कोणत्या गोष्टींपासून लांब राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे या विषयी माहिती दिली जाते.आजचा दिवस तुम्हाला तुमचा प्रगतीचा रास्ता दाखवतो कि, आपल्या समोर नवे संकट उभे करू शकतो.
राशीफळ हे पुरातन ज्योतिष शास्त्राची एक विधि आहे ज्याच्या माध्यमाने विविध कालखंडा बाबतीत भविष्यवाणी केली जाउ शकते. जिथे दैनिक राशीफळ दिवसभरातील घटनांना घेऊन भविष्यवाणी करते. त्याचप्रमाणे साप्ताहिक, मासिक तसेच वार्षिक राशीफळ मध्ये क्रमशः सप्ताह, महिने आणि वर्षाचे फळादेश/राशीफळ दिले जाते. वैदिक ज्योतिषात मेष, वृषभ, मिथुन, सिंह, कर्क, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ व मीन या बारा राशींचे भविष्य कथन केले जाते. ठीक त्याच प्रमाणे २७ नक्षत्रांचे ही भविष्यवाणी केली जाऊ शकते. प्रत्येक राशीचे आप आपले स्वभाव व गुणधर्म असतात अतः प्रतिदिन ग्रहांच्या स्थिती नुसार आणि भ्रमणानुसार जीवनात घडणाऱ्या घटना वेगवेगळ्या असतात. हेच कारण आहे की प्रत्येक राशीचे राशीफळ वेगवेगळे असते. येथे दिलेल्या दैनिक राशीफळात आम्ही अचूक खगोलीय घटनांच्या आधारावर फळादेश दिलेले आहेत. याच प्रकारे साप्ताहिक राशीफळात आम्ही सूक्ष्मतम ज्योतिषीय स्थितीवर लक्ष दिलेले आहे. जर आपण मासिक राशीफळा बद्दल बोललो तर साप्ताहिकाची कसोटी त्यावर ही लागू होते. वार्षिक राशीफळात आमचे अनुभवी ज्योतिषांनी वर्षभर होणारे सर्व ग्रहीय परिवर्तन, संक्रमण, भ्रमण आणि अनेक अन्य ब्रह्मांडीय गणनांच्या माध्यमाने वर्षाचे विभिन्न पहिलु, आरोग्य, वैवाहिक जीवन व प्रेम, धनधान्य आणि समृद्धी, कुटुंब आणि व्यवसाय तसेच नोकरी पेशा जश्या सर्व विषयांची पूर्ण विस्तारपणे विवेचना केली गेली आहे.

हे राशीफळ नक्की कोणत्या राशीवर आधारित असते जन्म राशीच्या कि नावं राशीच्या?

ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, दैनिक फळादेशाला जन्म राशीवर आधारित असते. “नावं” हे राशीच्या हिशोबानेच ठेवले जाते. बऱ्याच पंडितांचे मानणे आहे की, नाव राशी, जन्म राशी हे दोन्हीही खूप महत्वपूर्ण आहे.

हे राशीफळ कोणत्या राशीवर आधारित असते सुर्य राशीच्या की चंद्र राशीच्या?

राशीफळ हे चंद्र राशी म्हणजेच मुन साइन वर आधारित आहे. या भविष्य कथनाला सन साइन (सुर्य राशी) ने वाचणे योग्य नाही. भारतीय जज्योतिषामध्ये सर्वत्र चंद्र राशीलाच महत्व दिले जात आले आहे आणि अजूनही दिले जाते.

दैनिक राशीफळ कसे शोधले जाते?

भारतीय ज्योतिष मध्ये वर्तमान ग्रह स्थितीला संक्रमण किंवा भ्रमण म्हणतात. आपल्या राशीचे ग्रह वर्तमानात कुठे स्थित आहे यावर आजचे राशीफळ आधारित असते. आपल्या राशीला लग्न मानून त्यात संक्रमणाचे ग्रह ठेऊन जी कुंडली बनते ती कुंडली राशीफळंच मुख्य आधार आहे. याच्या व्यतिरिक्त पंचागाचे इतर अवयव जसे वार, नक्षत्र, योग आणि करण हे ही पहिले जाते. राशीफळ  लेखना मध्ये कुंडली ग्रहांची स्थिती आणि दशा इत्यादीचा वापर होत नाही.

दिलेले राशीफळ हे पूर्णपणे योग्य असते का ?


'राशीफळ' या नावानेच स्पष्ट होते की, राशीफळ राशीच्या आधारावर लिहिले गेलेले असते. संपूर्ण जगामध्ये लाखो लोकांच्या बाबतीत फक्त बारा राशींचें भविष्य कथन किंवा भविष्यवाणी करण्याच्या कारणाने याला सामान्य भविष्यवाणी ही मानली जाऊ शकते. अचूक भविष्यासाठी कुठल्या ज्योतिष किंवा पंडित करून संपूर्ण कुंडलीचे अध्ययन केले पाहिजे.


आमची माहिती जर तुम्हाला आवडली असेल, तर शेअर आणि कमेंट करायला विसरू नका...